हेल्दी लाइफस्टाइलच्या साधना मंदिराचे उद्घाटन संपन्न.
इचलकरंजी
हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनने एस आय टी कॉलेज जवळ पार्श्वनाथ नगर यड्राव येथे उभारलेल्या साधना मंदिर चा उद्घाटन समारंभ दुपारी ३.३३ वा संपन्न झाला प्रथमता कौन शिलेचे अनावरण व साधना हॉलचे फित कापून उद्घाटन स्वास्थ गुरु डॉ अमितजी राठी यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, उद्योजक नितीनजी धुत, डॉ. एस पी मर्दा, यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, क. आ. इचल जनता बॅकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे , विठ्ठलराव डाके , लक्ष्मीकांत मर्दा गिरीराज मोहता, चंद्रशेखर छाजड, डॉ. ए के चौगुले, डॉ. कुबेर मगदुम या मान्यवरांनी समारंभास उपस्थित राहुन हेल्दी लाईफ स्टाईल फौंडेशनच्या कार्यालयास शुभेच्छा दिल्या.
फौंडेशनचे अध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले यांनी प्रास्ताविकपर भाषनातुन फौंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी साधना मंदिर साठी सौ. सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्टची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल, उद्योजक श्री. नितीन धूत यांचे आभार मानले. डॉ. राहुल आवाडे यांनी फौंडेशनचे कोणतेही काम असुदे मी मदत करीन असे आश्वासन दिले.डॉ मर्दानी आपल्या मनोगतात शारीरिक आजार हे मानसिकतेतून तयार होतात तेंव्हा डॉ. अमित राठी सर यांनी करीत असलेले कार्याची आजच्या काळात गरज आहे असे मत व्यक्त केले.
उद्योजक नितीन धूत यांनी कमीत कमी वेळात साधना मंदिर उभारले बदल फौंडेशनच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
आजारी पडल्यानंतर बरे करण्यासाठी हॉस्पिटल्स, मेडिकल्स, लॅबोरेटरी भरपूर संख्येमध्ये उपलब्ध आहेत, पण आजारी पडू नये, यासाठी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. साधना मंदिर द्वारे ही व्यवस्था सर्वांपर्यंत पोहोचेल. आज समाजाला हेल्थ इन्शुरन्स पेक्षा हेल्थ ॲश्युरन्स ची गरज आहे. आपली जीवनशैली कशी उत्तम बनवायची, यासाठी संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली निर्माण केली आहे आणि हेल्थी लाइफस्टाइल फाउंडेशन द्वारा ही सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध आहे. समाजातील प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा, असे आव्हान डॉ. अमित राठी सरांनी केले.
खासदार धैर्यशील माने (दादा ) यांनी हेल्दी लाइफस्टाइल फाउंडेशन चे कार्य समजावून घेतलेनंतर त्यांनी शुभेच्छा देताना डाॅ अमितजी राठींचे कार्य म्हणजे भारतीय संस्कृतीतील ऋषी मुनींच्या गुरुकुल पद्धतीने आरोग्य व स्वास्थ जीवनाची पंररागत शिक्षण पद्धतीचेच शिक्षण हे आणि हे एक माॅडेल देशासमोर ठेवून सर्व भारत देशात हे माॅडेल नेऊन स्वथनभारत बनवू असे सांगितले. सुत्रसंचलन संजय सातपुते व नवाले मॅडम यांनी केले आभार फौंडेशनचे सेक्रेटरी शंकर उडपी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800