यंत्रमागकामगारांना ९० कोटी रूपयांचे बोनस वाटप
इचलकरंजी
इचलकरंजी या औद्योगि
गेल्या ४ ते ५ वर्षांमध्ये यंत्रमाग उद्योग अत्यंत खडतर प्रवासातून जात आहे. त्यातच रशिया – युक्रेन व इस्त्रायल – पॅलेस्टाईन – लेबनॉन युद्ध यामुळे वस्त्रोद्योगामध्ये जागतिक मंदीचे वातावरण आहे. सततच्या तेजीमंदीच्या खेळामुळे वस्त्रसाखळी अडचणीत सापडली आहे. यामुळे कापडाची निर्यात कमी झालेली आहे. देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कापडाला मागणी चांगली राहिल्यामुळे याही वर्षी यंत्रमागधारक व कामगारांचे नाते पुन्हा एकदा घट्ट झालेले आहे. यावर्षी आणखीन एक गोष्ट चांगली घडली. महाराष्ट्र सरकारने नविन वस्त्रोद्योग धोरण जाहिर केलेले आहे. त्याचबरोबर १ एप्रिल पासून २७ एच.पी. खालील म्हणजे साध्या यंत्रमागाला १ रूपयांची प्रति युनिट अतिरिक्त सवलत दिली आहे. तर २७ एच.पी. वरील यंत्रमाग ग्राहकांना ७५ पैशांची सवलत दिलेली आहे. यामुळे फ क्त इचलकरंजी शहरामध्ये वर्षाला ११० कोटींची लाईट बिलामध्ये बचत होणार आहे. यासगळ्याचा परिपाक म्हणून रॅपिअर, एअरजेट कारखानदारांनी ८.३३% इतका बोनस दिलेला आहे. तर साध्या मागाच्या कारखानदारांनी आपल्या कामगारांना १६.३३% इतका बोनस वाटप केलेला आहे. यामुळे इचलकरंजी शहरामध्ये दिवाळी धुमधड्याक्यात साजरी होण्याचा मार्ग दिसून येत आहे. कालपासूनच खरेदीला उधाण आलेले आहे. इचलकरंजीमध्ये बाजारपेठ सजलेली आहे. सर्वदूर दिवाळीचा झगमगाट दिसत आहे. येणारे पुढील वर्ष सर्व यंत्रमागधारक, कामगार, व्यापारी यांना भरभराटीचे जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केलेली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800