ICHMH51NEWS.IN
9921600800

राहुल आवाडे यांची कोरोचीत पदयात्रा,उस्फुर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल आवाडे यांची कोरोचीत पदयात्रा,उस्फुर्त प्रतिसाद
इचलकरंजी:
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ कोरोची (ता. हातकणंगले) येथे ग्रामदैवत श्री हनुमानाचा आशिर्वाद घेऊन काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद लाभला. जमलेले नागरिक, तरुणाईचा उत्साह आणि ज्येष्ठांचे आशिर्वाद यामुळे या भागात उत्साह निर्माण झाला होता.
कोरोची येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे आमदार प्रकाश आवाडे,. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पुजन करुन पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या पदयात्रेने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कोरोची गावात उत्साहाचे  वातावरण निर्माण झाले आहे.
पदयात्रेसाठी तरुणाईचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि मोठ्या प्रमाणात सहभागामुळे गावात जल्लोष साजरा करण्यात आला. पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी महिलांनी राहुल प्रकाश आवाडे यांचे औक्षण करत आशिर्वाद दिले. यावेळी उमेदवार राहुल आवाडे यांनी, आपल्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीबद्दल व भविष्यातील दृष्टिकोनाबद्दल तसेच कार्यकाळात केलेल्या विकासकामांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर ग्रामीण भाातील स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वांनी एकत्रत येऊन मला मतरुपी आशिर्वाद द्यावेत, मी गावाचा कायापालट करुन टाकीन, अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपासह सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ कमिटी मेंबर्स, कोरोची ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा