कन्या महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा वास्तव आणि संधी या विषयी कार्यशाळा संपन्न.
इचलकरंजी :
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी आणि श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिविल सर्विसेस यांच्यामार्फत *स्पर्धा परीक्षा वास्तव आणि संधी* या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेच्या प्रथम सत्रात दिल्ली येथील श्री अनिलकुमार तिवारी यांनी ‘यूपीएससीची तयारी ‘या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींच्या प्रश्नांचे शंका समाधान केले.
दुसऱ्या सत्रात श्री प्रणव साठे यांनी ‘राज्यसेवेची तयारी’ या विषयाची मांडणी करताना अभ्यासक्रमापासून मुलाखती पर्यंतच्या तयारीची माहिती दिली.
तिसऱ्या सत्रात श्री उमेश सुतार यांनी ‘कम्बाईन परीक्षेची तयारी’ या विषयाची मांडणी करताना अनेक स्पर्धा परीक्षा विषयक प्रेरणादायक उदाहरणे दिली.
चौथ्या आणि शेवटच्या सत्रात श्री अमोल खोत यांनी ‘स्पर्धा परीक्षा तंत्र व स्वरूप’ या विषयावर मांडणी करताना सरळ सेवा भरती पासून सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विषयी आढावा घेतला .
यावेळी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे यांनी आपल्या मनोगतात वेळेचे महत्त्व स्पष्ट करताना पदवी स्तरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास यश लवकर प्राप्त होण्याची शक्यता असते, असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि पाहुण्यांची ओळख प्रा संदीप पाटील यांनी करून दिली.आभार स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ मनोज जाधव यांनी तर सूत्रसंचलन प्रा किरण कानडे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी,प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800