भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त आजपासून व्याख्यान
इचलकरंजी
भ.महावीर जन्मकल्याणक महोत्सव सप्ताह सध्या इचलकरंजीमध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे. महावीरांच्या जयंती निमीत्त मंगळवार दि. ८ व बुधवार दि. ९ एप्रिल २०२५ इ.रोजी दुपारी ३.३० वा. महावीर भवन, गायत्री भवन शेजारी, मेन रोड, इचलकरंजी येथे मंगल प्रवचन सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये दि. ८ रोजी प.पू. मुनीश्री १०८ विद्यासागर महाराज यांचे भ.महावीर हे सर्व कालीन समस्यांचे समाधान कर्ता या विषयावर, तर दि. ९ रोजी प.पू. प्रज्ञाभारती सरस्वती श्रीजी महाराज साहेब यांचे महावीर स्वामीजीके दिव्य संदेश का आजके जिवनमे महत्व या विषयावर प्रवचन होणार आहे. हे दोन्ही साधू विद्वान व व्याख्यानावर प्रभूत्व असणारे विद्यावाचस्पती आहेत. तरी इचलकरंजी व परिसरातील सर्व नागरिक, बंधू भगिणी व श्रावक श्राविकांनी या मंगल प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800