श्री बालाजी पतसंस्थेला ३ कोटी रु. निव्वळ नफा
इचलकरंजी
श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेला २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा ३ कोटी रू झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मदन कारंडे यांनी दिली.संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे व इतर सहकारी मित्रमंडळी यांनी सन १९९२ मध्ये सामान्य कष्टकरी लोकांची सावकारी पाशातून सुटका करणेसाठी संस्थेची स्थापना केली. दिनांक २४/०२/१९९२ रोजी लावलेल्या बीजाचेआज सर्वांच्या सहकार्याने वटवृक्षात रुपांतर होताना दिसत आहे.
या आर्थिक वर्षात मागे वळून पाहताना जागतिक बँकेने वर्षाच्या सुरुवातीलाच चलनवाढीमुळे व इतर कारणामुळे जागतिक मंदीचा इशारा दिला होता . परिणामी उद्योग, व्यवसाय-व्यापार, बांधकाम क्षेत्र व सेवा यामध्ये आर्थिक मंदीची लाट जाणवू लागली आहे. याचा आर्थिक भार सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे इचलकरंजी नगरी हि आपल्या सर्वांची वस्त्रोद्योग नगरी परंतु या व्यवसायात आलेली अस्थिरता बाजारपेठेतील मंदी, महागाई यासारख्या व इतर कारणामुळे ठेव वाढीवर व कर्जाच्या वसुलीवर प्रतिकूल वातावरण निर्माण झाले.खाजगी बँका, फायनान्स बँक, मल्टीस्टेट पतसंस्था यांच्यातील उच्चांकी ठेव व्याजदर व कर्जाचे व्याजदरामुळे संस्थेला देखील आर्थिक स्थितीचा विचार करून ठेवीच्या व कर्जाच्या व्याजदरात बदल करावे लागतात जसे बँकेवर आरबीआय [RBI] नियंत्रण ठेवते तसेच पतसंस्थेवर नियामक मंडळ नियंत्रण ठेवू लागले आहे सहकार खात्याचे परिपत्रकानुसार एन. पी. ए. निकष व ऑडीट प्रमाणके बदलण्यात आले. त्यामुळे ऑडीट प्रमाण राखण्यासाठी संस्थेला खूप कसरत करावी लागली तरीदेखील संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत उत्तम प्रगती साधली आहे.
या सन २०२४ – २०२५ आर्थिक वर्षात संस्थेकडे ठेवी १३ ४ कोटी ४९ लाख असून १११ कोटी २३ लाख इतके कर्ज वितरण केलेले आहे. संस्थेची सभासद संख्या २०६७७ इतकी आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल ६ कोटी ७ लाख असून संस्थेचा राखीव व इतर निधी २० कोटी ९९ लाख इतका आहे. संस्थेने राखीव निधी रू. ५ कोटी ७५ लाखाची स्वतंत्र गुंतवणूक KDCC बँकेत केलेली आहे. संस्थेने एकूण ठेवीच्या ३९.८२ टक्के सुरक्षित गुंतवणूक रक्कम रू.५५ कोटी १५ लाख इतकी केलेली आहे संस्थेचा एकूण व्यवसाय २४९ कोटी ७ २ लाख इतका झालेला असून खेळते भांडवल १७७ कोटी १ लाख इतके आहे संस्थेचा सीआरएआर [भांडवल पर्याप्तता निधी] १५.९७ टक्के इतका आहे. संस्थेचा सीडी रेशो ७३.०८ टक्के इतका आहे. संस्थेचा एनपीए शून्य टक्के आहे. संस्था सभासदांना दरवर्षी १० टक्के लाभांश देत आली आहे. संस्थेला सन २०२ ४- २०२५ चा निव्वळ नफा ३ कोटी रु. इतका झालेला आहे संस्थेच्या व्यवस्थापकीय खर्चाचे ऑडीट प्रमाण हे २ टक्क्याच्या आत असणे गरजेचे असते त्यास अनुसरुन व्यवस्थापकीय खर्चाचे प्रमाण १.५ ५ टक्के इतके आहे.
संस्था प्रधान कार्यालय व आठ शाखातून उत्तम पध्दतीने कामकाज करीत आहे. संस्थेचे स्वतःचे डाटा सेंटर असून ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटी, ईसीएस कोड, एसएमएसबँकिंग तसेच क्युआर स्कॅन कोड इ. सेवा पुरविल्या जातात.ग्राहकांना जलद व दर्जेदार अत्याधुनिक सेवा देण्याच्या उद्देशाने संस्था लवकरच संभाजी चौक परिसरामध्ये लवकरच शाखा सुरु करीत आहोत. तसेच यावर्षी आभार फाटा चंदूर येथील स्वमालकीच्या जागेवर बांधकाम करून स्थलांतर करीत आहोत. “माध्यम बचतीचे, बचतीतून प्रगतीचे, प्रत्येकास खंबीर पाठिंब्याचे “या संस्थेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे ग्राहकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा संकल्प संस्थेने केलेला आहे. संस्थेच्या ठेवीच्या व कर्जाच्या आकर्षक योजना आहेत त्याचा लाभ सभासद ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने मा अध्यक्ष मदनरावजी कारंडे यांनी केले आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मदनराव कारंडे, उपाध्यक्ष शिरीष कांबळे, सुनील पाटील गजानन कडोलकर भगवान कांबुरे विजय बाबर संजय घायतीडक कल्लेश्वर वाघमोडे, सचिन शिंदे, सौ. बबिता माछरे, श्रीमती दिशा जाधव, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर सल्लागार मंडळ कादर तहशिलदार शितल दत्तवाडे, राजेंद्र पारीक,संदीप जाधव,विजय पाटील, शशिकांत राक्षे,,यशवंत दळवी, सुनील शिंदेजनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर असि जनरल मॅनेजर भारत गिड्डे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800