इचलकरंजीत नवकार महामंत्र महाजपास हजारोंचा प्रतिसाद,जितोच्या आयोजनात सुमारे चार हजार भाविकांचा सामूहिक सहभाग; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण
इचलकरंजी:
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) इचलकरंजी शाखेच्या वतीने आयोजित नमोकार महामंत्र सामूहिक महाजप कार्यक्रमास शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामदेव भवन मैदानात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ४००० जैन भाविकांनी सामूहिकपणे १०८ वेळा महामंत्र जप केला. त्यासोबतच अनेक भाविकांनी घरी व मंदिरांमध्येही जप करून सहभाग नोंदवला. इचलकरंजीच्या कार्यक्रमाचे प्रायोजक एम अशोका ग्रुपचे पदमचंदजी,अजितजी,अशोकजी खाबिया परिवार होते.
कार्यक्रमाचे आयोजन नामदेव मैदानात सकाळी ८ वाजता करण्यात आले होते.या कार्यक्रमात दिल्लीतील मुख्य समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण करण्यात आले. मोदींनी नमोकार मंत्राचे महत्त्व सांगत त्याला “विकसित भारताचे प्रतीक” असे संबोधले. त्यांनी गुजरातमधील जैन तीर्थंकरांच्या तपश्चर्येचा, नव्या संसद भवनातील जैन प्रतीकांचा आणि भारतात परत आलेल्या जैन मूर्तींचा उल्लेख करत जैन धर्माच्या योगदानाची माहिती दिली.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून पाणी जपून वापरणे,आईच्या नावाने झाड लावून त्याचे संगोपन करणे,
स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण,विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर,देशभ्रमणासाठी प्रेरणा,हिंसक वृत्तीऐवजी जीवनदायी कृतींचा अवलंब,स्वदेशी खाद्यपदार्थ सेवन, योग व खेळासाठी वेळ देणे, गरिबांसाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे,पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन,राहुल खंजिरे,रमेश जैन,विविध व्यापारी, उद्योजक, संस्था पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दिल्लीतील मुख्य कार्यक्रमास जितोचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी, अध्यक्ष विजय भंडारी,चेअरमन राजेंद्र जैन यांची उपस्थिती होती.
इचलकरंजीत या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जितोचे प्रकल्पप्रमुख मनीष मुनोत, अध्यक्ष महावीर बागरेचा, सचिव मुकेश पुनमिया, महिला विंगच्या अध्यक्षा सौ. रजनी जैन, सौ. जयश्री जोगड, सौ. उषा बोहरा,सौ. शैली जैन, तसेच अरुण ललवानी, अक्षय बालर,यश पहाडिया आदींनी पुढाकार घेतला. इचलकरंजी कार्यक्रमाच्या आयोजनात जितोचे कोषाध्यक्ष जितेंद्र छाजेड,कन्वेनर अंकित मुथा, यूथ विंगचे मयंक बागरेचा, गौरव जैन, हिमांशू जैन, तसेच महिला विंगच्या मुग्धा शाह, रजनी रावका यांचेही विशेष योगदान लाभले.
चौकट-
जैन धर्मीय आचार्य व संतांचा सहवास-पंतप्रधान नरेंदजी मोदी.
“नमोकार मंत्र हा विकसित भारताचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या बालपणापासून जैन आचार्यांच्या सान्निध्यात घडलेल्या अनुभवांची आठवण सांगितली. त्यांनी नव्या संसद भवनात जैन तीर्थंकरांच्या प्रतीकांची स्थापना झाल्याचे सांगून जैन धर्माच्या मूल्यांची प्रशंसा केली.व नवकार महामंत्राचे महत्व पटवून दिले.अभ्यासपूर्ण भाषणाची सर्वत्र चर्चा होती.
नवकार महामंत्र जपात मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी.
नवकार महामंत्र कार्यक्रमात उपस्थित जनसमुदाय

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800