इचलकरंजीत मुरूम चोरी प्रकरणावरून भाजप उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न,पोलिसांचा हस्तक्षेप,कारवाई न झाल्यास सोमवारी परत आत्मदहनाचा इशारा
इचलकरंजी :
शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुरूम चोरी झाल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी संबंधित मक्तेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती,कारवाई न झाल्याने दाभोळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
दाभोळे यांनी सांगितले की, मक्तेदारांनी १५० ते २०० डंपर मुरूम महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता उचलला असून, याबाबत त्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि बांधकाम अभियंता यांच्याकडे तक्रार दाखल केली. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न थांबवला आणि डिझेलची बाटली ताब्यात घेतली. पोलिसांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला, गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले. परंतु, अपेक्षित कारवाई न झाल्यास सोमवारी पुन्हा आत्मदहन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दाभोळेंचा आमदारांवर निशाणा.
सदर कामाचे मक्तेदार हे आ.राहुल आवाडेंच्या समर्थकांचे बंधू असल्याने करवाईपासून अभय मिळत असल्याचा गंभीर आरोप करत मक्तेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्यावर ही कारवाई करावी अशी मागणी दाभोळे यांनी केली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800