डीकेटीईच्या ११ पदवी कोर्सेसना एनबीएचे मानांकन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या ११ पदवी कोर्सेसना एनबीएचे मानांकन

इचलकरंजी:
 ‘नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडिटेशन ’(एनबीए) च्या डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये शिकविण्यात येणा-या एकूण ११ पदवी इंजिनिअरींग कोर्सेसना मानांकन घोषीत केले आहे. या वर्षी एमबीए, सिव्हील व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग कोर्सेसना मानांकन जाहीर केले आहे. एनबीए ही कॉलेजिसना मानांकन देणारी स्वायत्त संस्था आहे. यांच्या वतीने शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तापूर्ण दर्जा तपासणीसाठी मुल्यांकनाची प्रक्रिया राबविली जाते. एनबीएने दिलेल्या मानंकनाला देशातील शिक्षण प्रणालीमध्ये विशेष महत्वाचे स्थान आहे. एनबीए मानांकनामुळे विद्यार्थी,पालक,इंडस्ट्रीज व एकूण समाजालाच उत्कृष्ट शिक्षणांची हमी मिळते. संस्थेमध्ये ७० हून अधिक प्राध्यापक वर्ग डॉक्टरेट पदवी प्राप्त आहे त्याचबरोबर ७० हून अधिक प्राध्यापकांनी पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केले आहे. विशेष म्हणजे शै. वर्ष २०२४-२५ मध्ये इन्स्टिटयूटमध्ये १२० हून अधिक संशोधात्मक पेपर नामांकित प्रसिध्द होतील. आजतोवर १६० हून अधिक पेटंटसना मान्यता मिळाली आहे. जास्तीत जास्त विद्याशाखांना एनबीए मानांकन मिळविणारी डीकेटीई ही पश्‍चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असून कोल्हापूर जिल्हातून एमबीए कोर्सला एनबीए मानांकन मिळवणारी डीकेटीई ही एकमेव संस्था आहे.
या एनबीए समितीत भारतातील विविध नामांकित विद्यापीठ व संस्थेतील  तज्ञांचा समावेश असतो. हे मानांकन मिळविण्यासाठी इन्स्टिटयूटचे शैक्षणिक कार्य, संशोधनात्मक कार्य आणि औद्योगिक क्षेत्राशी इंटरऍक्शन हे विचारत घेतले जाते. सदर मानांकनासाठी आउटकम बेसड एज्यूकेशन सिस्टीम राबवावी लागते डीकेटीईमधे ही सिस्टीम कार्यरत आहे, तसेच डीकेटीईमधील अत्याधुनिक प्रयोगशाळा, उत्तम प्लेसमेंटचे रेकॉर्ड, उच्च शैक्षणिक दर्जा या सर्वांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. एनबीए मानांकनामध्ये  इंजिनिअरींगचे इलेक्ट्रीकल, सिव्हील व एमबीए अशा ३ कोर्सेसना नुकतेच मानांकन प्राप्त झाले आहे. डीकेटीईतील सिव्हील व इलेक्ट्रीकल कोर्स हे कोअर ब्रँचेस असून या कोर्सना देखील एनबीए ने मान्यता दिलेली आहे.
एनबीएकडून उच्चपदस्थ समितीने संस्थेस भेट दिली व प्रत्येक अभ्यासक्रमांचे काटेकोरपणे मुल्यांकन केले. या भेटीमध्ये संस्थेतील अभ्यासक्रमातील घटक, अध्ययन, अध्यापन आणि मुल्यमापन, संशोधन, सल्ला आणि विस्तार कार्य, पायाभूत सुविधा आणि शिक्षण, विद्यार्थी सहभाग, व्यवस्थापन, नवीन उपक्रम आणि पध्दती या सर्व बाबींची सर्वांगाने सखोल पडताळणी करण्यात आली. तसेच संस्थेचे सर्व सदस्य, संचालिका, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि माजी विद्यार्थी यांचेशी संवाद साधला.  संस्थेतील प्राध्यापकांचे परिश्रम, औद्योगिक क्षेत्राशी संस्थेचा असलेला संबंध व करार व सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून होणारे सामाजिक कार्य याचा एनबीए समितीने विशेष गौरवपूर्ण उल्लेख केला.
’’एनबीए मानांकन ही सर्वांसाठी अभिमानाची व आनंदाची बाब असून, यामुळे संशोधन, गुणवत्तापूर्ण शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्यरत राहण्यास प्रेरणा मिळाली आहे मानद सचिव डॉ सपना आवाडे, यांनी यावेळी भावना व्यक्त केली.’’ या सर्व यशामध्ये संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी यांच्याबरोबरच संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, खजिनदार पी.डी. दत्तवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व विश्‍वस्त आणि संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर प्रा.डॉ. यु. जे. पाटील, विभागप्रमुख डॉ आर. एन. पाटील, प्रा. ए.एम. मुल्ला, प्रा. पी. एम. जाधव व समन्वयक,  यांचा सिंहाचा वाटा आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More