आपटे वाचन मंदिरामध्ये ग्रंथपाल दिन संपन्न.
इचलकरंजी :
आपटे वाचन मंदिरामध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त इचलकरंजी नगरीतील शाळा महाविद्यालयातील ग्रंथपालांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर . रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस श्री . प्रसाद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्री . काशिनाथ जगदाळे यांनी केले व पाहुण्यांचा परिचय कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी करून दिला. उपस्थित ग्रंथपाल आणि ग्रंथालय कर्मचारी यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रंथपाल श्री. अनिल कदम व सौ. सीमा नेजे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे श्री प्रसाद कुलकर्णी यांनी आज वाचन संस्कृती बदलत चालली आहे याची खंत व्यक्त करून, ती जपण्याची व जोपासण्याची जबाबदारी ग्रंथपाल व ग्रंथालयांची आहे असे आशावादी उद्गार काढले.
आभार प्रदर्शन सहकार्यवाह डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी केले . कार्यक्रमास संचालक श्री. बाळासाहेब कलागते, श्री प्रशांत बापट, माया कुलकर्णी आणि ग्रंथपाल श्री .आनंदा काजवे उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







