ICHMH51NEWS.IN
9921600800

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी… 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी… 

इचलकरंजी
२१ वर्षांनी आलेली श्रावण मासातील अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने पहाटे पासूनच पंचगंगा वरदविनायक मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी झाली.
अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने पंचगंगा नदी किनारी वरदविनायक मंदिरांमध्ये दर्शनासाठी लाखो भाविकांचा महापूर होता.पहाटे पासूनच भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थानामध्ये जाऊन भाविकांनी पूजा अर्चा करत विघ्नहर्त्या वरदविनायकाचे दर्शन घेतलं जातं होते या निमित्ताने मंदिरांची आकर्षक फुलांची सजावटीसह लाईट माळांची आरास करण्यात आली  कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता ही चोख ठेवण्यात आली.तर वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक पोलीस उपस्थित होते
अंगारकी संकष्टी गणेश चतुर्थीनिमित्ताने मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली आपल्या लाडक्या दैवताचं दर्शन घेत हे भाविक. पूजा, आरती करत देवाला साकडे घातली जात होते यावेळी सामूहिक अथर्वशीर्ष ,स्तोत्र वेद,आरतीही करण्यात येत होती मंदिर भक्त मंडळ दु ११ वाजले पासून साबुदाणा भगर प्रसाद वाटप चालू होता  पहाटेपासूनच भाविक मंदिरात दाखल होत होते. प्रत्येकजण रांगेत उभा राहून देवाचं दर्शन घेत होता. कोणतीही गडबड आणि गोंधळ न करता हे भाविक गर्दीतून मार्गक्रमण करत होते.
 वरदविनायक दर्शनाचा सुमारे लाखभर भाविकानी लाभ घेतला होते. मंदिरात काकड आरती भक्त मंडळ कडुन करण्यात आली,तर सकाळची आरती श्री व सौ युवराज माळी यांच्या हस्ते तर साजसंध्याकाळची पुजा आरती जिल्हा न्यायाधीश गांधी व भोसले व इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे शिंदे यांनी केली चंद्रोदय रात्री आरती मंदिर भक्त मंडळ पदाधिकारी हजोरो भक्तजनांच्या साक्षीने मान्यवराच्या हस्ते  बाप्पाच्या जयघोषात आरती करण्यात आली. यावेळी मंदिर भक्त मंडळ अध्यक्ष अध्यक्ष अशोक स्वामी ,बाळासाहेब जांभळे, हनुमंत वाळवेकर,विष्णुपंत शिंदे, विनायक रेडेकर,प्रशांत चाळके,सुनील ताडे,गजानन स्वामी, मोहन नाझरे,सचिन देशमाने,सुनील भैया तोडकर, सुधीर जाधव,बाळकृष्ण मिठारी,गजानन पाटील,विवेक मस्के यांनी परिश्रम घेतले
वरदविनायक मंदिरात आरतीप्रसंगी जिल्हा न्यायाधीश गांधी,अति आयुक्त सुषमा शिंदे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा