इचलकरंजीत रविवारी मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज उपचार शिबीर
इचलकरंजी –
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व ॲनस् कमिटी, इनरव्हील क्लब आणि अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘विनाऑपरेशन लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबीर’ रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते १ ह्या वेळेत रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडा नगर, इचलकरंजी येते आयोजित केले आहे.
व्हेरिकोज व्हेन्स लेसर पद्धतीमध्ये ऑपरेशन न करता रक्तवाहिनी लेसरने गोठवली जाते. चिरफाड नसल्यामुळे लेसर पद्धतीमध्ये कमी वेदना होतात तसेच रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. व्हेरिकोज व्हेन्स हा आजार पुरुषापेक्षा महिला मध्ये जास्त प्रमाणात असतो. इचलकरंजीतील पॉवरलूमवर जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार, प्रमाणापेक्षा जास्त वजन असणारे आणि जास्त वेळ उभे राहून काम करणाऱ्यांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो.
पायाची सूज, दुखणे, इत्यादी विकार असलेल्या रुग्णांनी शिबिरास येताना आपले आधार कार्ड व रेशन कार्ड तसेच पायाच्या व्हेन्स कलर डॉप्लर करून घेऊन येण्याचे असून इचलकरंजी व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







