ICHMH51NEWS.IN
9921600800

गणरायावरील श्रद्धा मूर्तीच्या उंचीत व डॉल्बीच्या आवाजात मोजता येत नाही, नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा- जिल्हापोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणरायावरील श्रद्धा मूर्तीच्या उंचीत व डॉल्बीच्या आवाजात मोजता येत नाही, नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा- जिल्हापोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता.

इचलकरंजी
 गणराया वरील श्रद्धा ही मूर्तीच्या उंचीत आणि डॉल्बीच्या आवाजात मोजता येत नाही त्यामुळे नियम पाळून उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत इचलकरंजी येथे केले.महेश सेवा समिती येथे झालेल्या बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले लहान मूर्ती असली किंवा पारंपारिक वाद्य असली तरी आपला भक्तिभाव महत्वाचा असून डॉल्बी आणि आवाजाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वांना गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात यावा यासाठी उपाय योजना करण्यात येतील. कोणीही कायदा हातात घेऊ नये कायद्याचे अंमलबजावणी करणे हे आमचे काम असून चुकीचे वागणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले कोणत्याही वाईट गोष्टीत  शहराचे नाव येता कामा नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी सांगितले.यावर्षी जरी डॉल्बीचे बुकिंग झाले असले तरी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे तेवढ्याच डेसीबल मध्ये डॉल्बी वाजवावा आणि पुढील वर्षी डॉल्बीचे बुकिंग करू नये असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी केले, इचलकरंजी शहरात प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत गणराया अवॉर्ड सुरुवात करण्यात येणार असून त्यातील निवड झालेले प्रस्ताव जिल्हा पातळीवर व त्याच्यानंतर राज्यपातळीवर पाठवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव मंडळ व नागरिकांच्या वतीने बोलताना शहाजी भोसले यांनी डॉल्बी परवानगी द्यावी गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करावी, पंढरीनाथ ठाणेकर यांनी पंचगंगा नदीतच गणपती विसर्जित करण्यास परवानगी द्यावी, राजु बोंद्रे यांनी कामाचा ताण बघता पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी केली,बाळासाहेब कलागते यांनी बंच केबलचे काम केल्याने महावितरणचे धन्यवाद मानले झाडांच्या फांद्या त्वरित छाटून घ्याव्यात, स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित करता शेखर शहा यांनी गणेशोत्सव कालावधीत स्वच्छतेसाठी चांगली व्यवस्था करण्याचे आवाहन केले. उमाकांत दाभोळे यांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ काम सुरू असल्याने  मिरवणुकीत काळजी घेण्याची सूचना केली. संतोष शेळके यांनी धांगडधिंगा टाळून सण उत्साहात साजरा करावा, संतोष सावंत यांनी अमली पदार्थ व दारू कारवाई प्रामुख्याने राबवली जावे असे सांगितले,उमेश पाटील यांनी रिंग रोड अतिक्रमण मुक्त करावा कृष्णा पाणी योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यावर मुरुमीकरण करून रस्ता व्यवस्थित करावा,रस्त्याची दुरावस्था असल्याने मंडप खुदाई शुल्क माफ करावे अशी मागणी केली,अभिजीत पटवा यांनी सीसीटीव्हीचा प्रश्न चार वर्षापासून प्रलंबित असून त्याचा सोक्ष मोक्ष लावावा तसेच एसटी वाहतूक गणेशोत्सवाच्या विसर्जना दिवशी रिंग रोडने व्हावी अशी मागणी केली.सलीम अत्तार सर यांनी हिंदू मुस्लिम  एकोप्याने सण साजरा करण्याचे आवाहन केले, आनंदा मकोटे यांनी अशी बैठक वारंवार घेण्याचे सूचना केली,मंगेश मस्कर यांनी पंचगंगा नदीत मुर्ती विसर्जनावेळी प्रशासन कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याची तक्रार मांडली.
 प्रशासनातर्फे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी जनता व प्रशासन यामध्ये समन्वय साधून उत्साहात सण साजरा करू, सर्व कागदपत्रे देऊनच परवानगी घ्यावी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम,सायबर फ्रॉड बाबत जनजागृती करणारे देखावे सादर करावेत,प्रत्येक मंडळांनी सीसीटीव्ही लावावे नियमाचे पालन करावे अशी सूचना केली.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी आमदार फंडातून बारा लाख रुपयाचा चेक आम्ही तातडीने देत आहोत प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी,फडणवीस सरकारने राज्योत्सवाचा दर्जा  दिलेला आहे ४९ किमी पैकी ४० किमी बंच वायर बदलून झाली असून त्यानुसार उर्वरित नऊ किमी आठवड्यात होईल त्याबद्दल महावितरणचे कौतुक केले.शहरातील नशेखोरी मोडून काढण्याचे आवाहन करत इचलकरंजी फेस्टिवल अंतर्गत ऑपरेशन सिंदूर,स्वदेशी उत्पादने वापरा वापरण्याची जनजागृती, व्यसनमुक्ती कार्यक्रम या तीन विषयासाठी प्रत्येकी २५,२०,१५,१०,५  हजार अशी ५ बक्षिसे जाहीर केली.इचलकरंजी  शहरात मोठ्या मूर्ती असल्याने उ पंचगंगेतच विसर्जन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारे महावितरणचे गोंदिल,अमृत भोसले, महापालिका उपायुक्त अशोक कुंभार, तिने पोलीस स्टेशनचे व शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी व विविध गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी,शांतता समिती,दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.आभार प्रदर्शन इचलकरंजी पोलीस ठाण्याचे महेश चव्हाण तर सूत्रसंचलन युवराज मोहिते यांनी केले.
मार्गदर्शन करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे
मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता
उपस्थित जनसमुदाय
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा