ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत स्वच्छता अभियान राबवित १७ टन कचऱ्याचे संकलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत स्वच्छता अभियान राबवित १७ टन कचऱ्याचे संकलन

इचलकरंजी:

“स्वच्छता हीच सेवा – एक दिवस, एक तास, एक साथ” या उपक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे आज मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेतून शहरातील विविध भागांमधून तब्बल १७ टन कचरा जमा करण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजल्यापासून महासत्ता चौक, जुना चंदूर रोड, पंचवटी टॉकीज परिसर, नाईट कॉलेज परिसर, सी.ई.टी.पी. प्लांट ते बिग बाजार मार्ग, शहापूर स्मशानभूमी ते सांगली नाका अशा ७ ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. नाईट कॉलेज, इंडस्ट्रीयल इस्टेट परिसर येथे आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे-कोल्हे, उपायुक्त विद्या कदम यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शपथ घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

Advt

या वेळी स्वच्छतेचे घोषवाक्य देत नागरिकांना जनजागृती करण्यात आली तसेच मोठ्या प्रमाणावर श्रमदान झाले. स्वच्छता अभियानात वैद्यकीय अधिकारी, अभियंते, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, स्थानिक नागरिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-शिक्षक उत्साहाने सहभागी झाले.

या उपक्रमामुळे “स्वच्छ भारत अभियान २.०” अंतर्गत जनसहभागातून स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश शहरभर पसरला.

स्वच्छता अभियानात सहभागी आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे, सुनीलदत्त संगेवार, विजय राजापूरे,विद्या कदम

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा