ICHMH51NEWS.IN
9921600800

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या ३३ व्या हंगामाकरिता बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या ३३ व्या हंगामाकरिता बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ संपन्न

व्हिडीओ- https://youtube.com/shorts/OxcPcfEL7mA?si=QFRvEk2L5_AblgsQ

 

फोटो
इचलकरंजी/प्रतिनिधी –
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या ३३ व्या ऊस गाळप हंगामासाठी संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे व सौ. किशोरी आवाडे आणि संचालक आमदार राहूल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न झाला.
शेतकऱ्यांसाठी कारखान्याच्या विविध योजनांमुळे सन २०२५-२६ या ३३ व्या गाळप हंगामासाठी  सुमारे २२ हजार ५५५ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. या हंगामातील ऊस गाळपासाठी कारखान्याची मशिनरी व सर्व यंत्रणा सज्ज होत आहे. या हंगामातील ऊस तोडणी वाहतूकीसाठी ३४१ ट्रक ट्रॅक्टर, ६२३ अंगद व डंपींग, ३४३ बैलगाड्या आणि ऊस तोडणी ६३ मशिन इतक्या तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार झालेले आहेत. या हंगामात व्यवस्थापनाने २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तेंव्हा सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामाकरीता पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केले.
समारंभास कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, माजी चेअरमन उत्तम आवाडे, सौ. सपना आवाडे, सौ. मौसमी आवाडे, केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे, कारखान्याचे संचालक सर्वश्री अभयकुमार काश्मिरे, सूरज बेडगे, आदगोंडा पाटील, शितल आमण्णावर, आण्णासो गोटखिंडे, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे, सुनिल पाटील, प्रकाश पाटील, दरगोंडा पाटील, पार्श्वनाथ नारे, प्रशांत कांबळे, सुभाष जाधव, सौ. कमल पाटील, सौ. वंदना कुंभोजे माजी संचालक सुकुमार किणींगे, फैय्याज बागवान, सुमेरू पाटील, जे.जे. पाटील तसेच हुपरीचे आण्णासाहेब शेंडुरे, दिनकर ससे, बाळासाहेब रणदिवे, योगेश कळंत्रे, अमेय जाधव व कार्यकारी संचालक श्री. मनोहर जोशी आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.

बॉयलर पूजन समारंभावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, प्रकाश आवाडे, सौ. किशोरी आवाडे,आमदार राहूल आवाडे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा