खाजगी सावकारकीतून त्रास, दमदाटी; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी
इचलकरंजी पोलीस ठाण्यात सौ. ऋषिका सोमनाथ वाघमारे (रा. लालनगर, इचलकरंजी) या महिलेविरुद्ध खाजगी सावकारकीतून त्रास देत धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महावीर संजय मिसाळ (वय 30, रा. रिंगरोड लालनगर, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी कौटुंबिक कारणास्तव आरोपी यांच्याकडून दर आठवड्याला १०% व्याजदराने १,३०,००० इतकी रक्कम घेतली होती. वेळोवेळी व्याज आणि मुद्दल मिळून फिर्यादींनी एकूण ४,९४,००० रक्कम परत दिल्याचे नमूद केले आहे.
तरीही आरोपी महिलेने खाजगी सावकारकी पद्धतीने जास्तीचे पैसे उकळण्याच्या हेतूने फिर्यादीच्या घरी येऊन शिवीगाळ व दमदाटी करत आणखी १ लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. तसेच विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत फिर्यादीच्या कुटुंबास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.हि घटना १२ फेब्रुवारी २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली असून पोलिसांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदवला आहे,तपास पो सब इन्स्पेक्टर सीमा डोंगरे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




