तरुणाला मारहाण, सलून दुकानाची तोडफोड; तिघांवर गुन्हा
इचलकरंजी
सुशांत कदम (वय २२) हे विद्यानिकेतन हायस्कुलच्या मैदानावर कार्यक्रम पाहत असताना आरोपी अक्षय पाखरे व दोन साथीदारांनी त्यांना विनाकारण मारहाण केली.
नंतर आरोपींनी फिर्यादीच्या गल्लीमध्ये येत शिवीगाळ करत त्यांचे सलून दुकान व बोर्ड, खिडक्यांच्या काचा तसेच दोन अॅक्सेस मोपेडची दगडफेक करून तोडफोड केली. या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली.शिवाजीनगर पोलोसात याबाबत गुन्हा नोंदवला असून तपास स.फो.आबिटकर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




