ICHMH51NEWS.IN
9921600800

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  श्री शंभुतीर्थ लोकार्पण १५ डिसेंबरला,समितीकडून विश्वासात न घेतल्याचा आरोप तारीख समिती जाहीर करणार असल्याचे महाजन गुरुजींचे मत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  श्री शंभुतीर्थ लोकार्पण १५ डिसेंबरला,समितीकडून विश्वासात न घेतल्याचा आरोप तारीख समिती जाहीर करणार असल्याचे महाजन गुरुजींचे मत

इचलकरंजी

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने के. एल. मलाबादे चौकाच्या सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत साकारलेल्या श्री शंभुतीर्थ (छत्रपती संभाजी महाराज पुतळा) प्रकल्पाचे लोकार्पण सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या सोहळ्यात शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही करण्यात येणार असून अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी  शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

समिती तारीख जाहीर करणार-महाजन गुरुजी

मात्र दुसरीकडे श्री शंभूतीर्थ स्मारक समिती ने आयुक्तांची भेट घेत कोणत्या आधारावर तारीख जाहीर केली असे विचारण्यात आले,त्यावर आयुक्तांनी मुख्यमंत्री कार्यालयातुन १५ तारखेला मुख्यमंत्री येऊ शकतात असा फोन आल्याचा व त्या आधारावर वृत्तपत्रासाठी प्रेस नोट दिल्याचे सांगितले,मात्र समितीने लेखी कोणताही दौरा जाहीर नसताना तसेच समितीशी चर्चा न करता तारीख जाहीर केल्याने नाराजी व्यक्त करत नंतर समिती अधिकृत तारीख जाहीर करेल असे गजानन महाजन गुरुजींनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केले. झालेल्या प्रकाराबाबत आ.राहुल आवाडे यांच्याशी कसलेही बोलणे झाले नसल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले एकंदरीत समन्वयाचा मोठा अभाव यामुळे दिसुन आला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा